सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

मुंबई| 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. खरतर हा सोहळा गेल्या वर्षी मे महिन्यात होणं अपेक्षित होतं मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लाॅकडाऊन करण्यात आल्यानं हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. 22 मार्च रोजी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-2020’ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमागृहात रिलीज झालेला चित्रपट ‘छिछोरे’ला मिळाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

सुशांत सिंहच्या ‘छिछोरे’ सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. खास करुन या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. तसचं सुशांतच्या आत्महत्येनंतर हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला तो म्हणजे या सिनेमाच्या कथानकामुळेच.

श्रद्धा कपूर, प्रतीक बब्बर, वरुण शर्मा, ताहिर राज आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर या सिनेमाने ‘सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा’ हा पुरस्कार पटकावला आहे. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मनोरंजन सृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.

यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी फिचर फिल्म विभागासाठी एकूण 461 चित्रपटांचा समावेश होता. 2019 मधील मोस्ट ‘फिल्म फ्रेंडली स्टेट’ विभागात तेरा राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून हा पुरस्कार सिक्किमला जाहीर करण्यात आला आहे.

‘छिछोरे’ हा एक अत्यंत सकारात्मक सिनेमा होता. “आत्महत्येविरोधात युद्ध” अशी या सिनेमाची थीम लाईन होती. अशा प्रकारच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने स्वत: आत्महत्या करणे हे खरंच धक्कादायक आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या – 

कंगना रणौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘या’…

आयुर्वेदिक जायफळाचे ‘हे’ आहेत अनेक गुणकारी फायदे

“परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना कटकारस्थान…

मिताली मयेकरच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा…

जाणून घ्या! उन्हाळ्यात दही भात खाण्याचे ‘हे’…