बिपिन रावत दर महिन्याला पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला देणार

नवी दिल्ली | चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी दर महिन्याला आपल्या पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानुसार एप्रिल महिन्याच्या पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडमध्ये जमा करण्यात आले आहेत.

बिपिन रावत वर्षभर आपल्या पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला दान करणार आहेत. बिपिन रावत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पुढील एक वर्ष आपल्या पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडमध्ये जमा करावे, असं सांगितलं होतं.

बिपिन रावत यांनी पत्र पाठवल्यानंतर त्यांच्या एप्रिल महिन्याच्या पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

दरम्यान, कोरोनाविरोधाच्या लढाईत सरकारला आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी मार्च महिन्यात सैनिकांनी एका दिवसाचा पगार पीएम केअर फंडला दान केला होता. त्यावेळीदेखील बिपिन रावत यांनी आपल्या एक दिवसाचा पगार पीएम केअर फंडला दान केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात आज 1196 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

-मुंबई विमानतळावरून दररोज 25 विमाने करणार उड्डाण; ठाकरे सरकारचा निर्णय!

-मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा, सोबतच केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

-‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

-चिंताजनक! राज्यात चोवीस तासात 87 पोलिसांना कोरोनाची लागण