लाटेवर लाट कोरोनाची लाट! किती वेळा येणार कोरोनाची लाट???, तज्ज्ञ म्हणतात…

मुंबई | मागील वर्षी कोरोना (Corona) महामारीला सुरूवात झाली. हळूहळू कोरोना महामारी जगभर पसरली. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही जागतिक महामारी असल्याचं घोषित केलं.

त्यानंतर आता भारतात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आणि भारतात सध्या तिसरी लाट आली आहे. अशातच आता या कोरोनाच्या लाटा येणार तरी किती?, असा सवाल विचारला जातोय. त्यावर आता तज्ज्ञांनी उत्तर दिलं आहे.

कोरोना संसर्गाची लाट कोरोना विषाणू कोणत्या रूपात म्यूटेशन करत आहे आणि तो नवीन प्रकार किती संसर्गजन्य आहे यावर अवलंबून असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

1918 च्या महामारीला निकष म्हणून पाहिल्यास, अशी अपेक्षा केली जाऊ शकते की कोरोना संसर्ग देखील कधीतरी जगातून पूर्णपणे काढून टाकला जाईल. कोरोना विषाणू जास्त टिकणार नाही, असं IVF तज्ज्ञ आणि ‘सीड्स ऑफ इनोसन्स’ च्या संस्थापक डॉ. गौरी अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

कोरोना ज्यावेळी स्थानिक महामारीत रूपांतरित होईल. अशा परिस्थितीत, कोरोना संसर्गाच्या मोठ्या प्रमाणात लाटा येण्याची शक्यता कमी होईल, असंही गौरी अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

अमेरिकन शास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी नुकतंच म्हटलं आहे की, ही महामारी कायमची राहू शकत नाही आणि तिचा अंत अगदी जवळ आहे.

बुद्धिबळाच्या या खेळात कोणीही विजेता नाही, हा सामना ड्रॉ झाल्यासारखा आहे आणि हा कोरोना व्हायरस लपून बसेल आणि आपण खरोखर जिंकू आणि लवकरच लोक चेहऱ्याच्या मास्कपासून मुक्त होतील, असा विश्वास देखील डाॅ कुतूब यांनी व्यक्त केला आहे.

डेल्टा व्हेरियंटने आतापर्यंत भारतात सर्वाधिक कहर केला आहे. ओमिक्रॉन प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा जास्त सांसर्गिक आहे, परंतु ओमिक्रॉन व्हेरियंटचा मृत्यू दर खूपच कमी असल्याचं आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

शरद पवारांनी घेतला पुणे मेट्रोचा आढावा; चंद्रकांत पाटील म्हणतात, “हक्कभंग आणला पाहिजे”

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?” 

‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार