नॅशनल क्रश रश्मिका मंदना गुडबायमध्ये बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्याची बनणार मुलगी

मुंबई |  गेल्या वर्षी कोरोना संसर्ग रोगाला आटोक्यात येण्यासाठी सरकारने संपूर्ण देशरात लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्यावेळी सर्व उद्योग-धंदे, सर्व कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर झाला. तसेच या काळात चित्रपट सृष्टीवरही झाला.

काही महिन्यापासून कोरोनाची परिस्थी आटोक्यात आल्यानंतर सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर अनेक चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. तसेच काही चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. अशातच नॅशनल क्रश रश्मिका मंदना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गुडबाय या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत बॉलिवूडचे बिग-बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. आता या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

या चित्रपटा कोण-कोणत्या मुख्य भूमिका असणार आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. याचे थेट उत्तर चित्रपटाची निर्माता एकता कपूर यांनी दिले आहे. रश्मिका आणि अमिताभ हे दोघं या चित्रपटामध्ये एक जोडपं म्हणून नाहीतर बाप-लेक म्हणून दिसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

या चित्रपटामधी रश्मिका आपले नशीब आजमणार आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या डोळ्यात त्रास होत असून, त्यांची शस्त्रक्रिया होणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचवेळी त्यांनी गुडबाय या चित्रपटाविषयी एक अपडेट दिलं होतं. एप्रिल महिन्याच्या 5 किंवा 6 तारखेला या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण चंदीगढमध्ये होणार आहे. तसेच चित्रपटातील शहरातील काही सीनच्या चित्रीकरणासाठी मुंबईमधील एक स्टूडीओ बनवण्यात आला आहे. अमिताभ आणि रश्मिका या दोघांचा हा चित्रपट पहिला असणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करणार असून, या चित्रपटाचे निर्मितीकरण एकता कपूर करणार आहे. एकता आणि विकास या दोघांनी याआधी लुटेरा, उडता पंजाब हे चित्रपटसोबत केले आहेत. या चित्रपटात आपल्याला भावना आणि करमणुकीचे रंग पाहायला मिळतील. हा संपूर्ण चित्रपट कौटुंबिक असणार आहे, असं एकता कपूरने सांगितलं आहे.

दरम्यान, गुडबाय या चिडत्रपटामध्ये रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांच्या वतिरिक्त दुसऱ्या कोणत्या भूमिका असणार आहेत? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे. याविषयी अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही.

महत्वाच्या बातम्या-

मास्क न घातलेल्या कंगना रणौतला ‘या’ अभिनेत्यानं…

उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर होऊ…

पुन्हा एकदा ऐकू येणार ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हा’…

राशीभविष्य: आज ‘या’ राशींच्या लोकांसाठी आहे…

जाणून घ्या! गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’…