नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ‘या’ अभिनेत्यासोबत अडकणार लवकरच विवाहबंधनात?

मुंबई | नॅशनल क्रश असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच चर्चेत असते. रश्मिकाने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोज्, व्हिडीओज् आणि तिचे लाईव्ह सेक्शन्स चाहत्यांच्या मनावर राज करत असतात.

टॉलिवूड विश्वात रश्मिका सुहरहिट होतीच परंतु आता संपूर्ण जगभरात तिला पसंत केलं जात आहे. आत्तापर्यंत रश्मिकाने अनेक सुपरहिट चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

रश्मिका आणि अल्लू अर्जूनचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. यातच आता रश्मिकाबद्दल एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे.

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा गेल्या काही दिवसांपासून मुंबईत डेटवर जात असल्याचं समोर येत आहे. रश्मिका आणि विजय रिलेशनशिपमध्ये असून या वर्षा अखेरीस विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हंटलं जात आहे.

सध्या रश्मिकाने मुंबईत एक अपार्टमेंट विकत घेतलं असून तिथं ती राहत आहे. त्यामुळं रश्मिका आणि विजय मुंबईमध्ये अनेकदा डेटवर जाताना दिसले.

चाहत्यांना विजय आणि रश्मिका यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पहायला प्रचंड आवडत. तसेच आता त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेड या दोन सुपरहिट चित्रपटांमधून विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी एकमेकांना साथ दिली आहे. आता अशीच साथ खऱ्या आयुष्यातही दोघे एकमेकांना देतील का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘पुढील लोकसभा निवडणुकीत…’; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा 

‘ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या राणेंना…’; ‘या’ शिवसेना नेत्याने राऊतांना सुनावलं

डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा! 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी भाऊ वाटतो, कारण…”