देश

दिलासादायक! रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला, आत्तापर्यंत 10,000 रुग्ण परतले घरी

नवी दिल्ली | झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग आता काहीसा कमी झाल्याची पॉझिटिव्ह बातमी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच आत्तापर्यंत 10,000 पेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा गुणाकार आता मंदावला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी या आधी 10.5 दिवस लागत होते. आता हा दर 12 दिवसांवर आला आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वात कमी आहे. एकूण रुग्णांच्या केवळ 3.2 टक्के रूग्णांचा मृत्यू होतो, अशी सध्या आकडेवारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शनिवारपर्यंत भारताने एकूण 10 लाख कोरोना टेस्ट केल्या आहेत. एका दिवसात जवळपास 74 हजार टेस्ट केल्या जात असल्याचंही हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

-आता तुम्ही सत्ताधारी आहात नुसता शिमगा करु नका, प्रक्रिया पुर्ण करा -आशिष शेलार

-राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा; एकूण 361 पोलिसांना कोरोनाची लागण

-“IFSC सेंटर गुजरातला हलवल्यास देशाचं मोठं आर्थिक नुकसान होईल”

-‘रडीचा डाव खेळू नका’; जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर