राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

मुंबई| प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी आज अखेर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या दु:खद घटनेमुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

अनेक राष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या सुमित्रा भावे यांची कारकिर्द खूप गाजली. आपल्या करिअरच्या काळात त्यांनी अनेक उत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि या चित्रपटांना विविध पुरस्कारही मिळाले.

सुमित्रा यांच्या ‘बाई’, ‘पाणी’ हे दोन लघुपटं चांगलीचं गाजली. या लघुपटांना मिळालेल्या यशानंतर त्यांनी ‘दोघी’ हा चित्रपट 1995 साली तयार केला. ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, संहिता, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुमित्रा यांनी उत्तम रित्या पार पाडली.

सुमित्रा भावे यांनी सुनिल सुखटणकर यांच्यासोबत एकत्रित काम करत भारतातील चित्रपट आणि टेलिव्हिजनवर आपला ठसा उमटवला होता. त्याचसोबत भावे आणि सुखटणकर यांनी संयुक्तपणे 14 फिचर फिल्म्स, 50 हून अधिक शॉर्ट फिल्म्स आणि टेलिव्हिजनसह टेलिफिल्म्स सुद्धा दिग्दर्शित केल्या आहेत.

सुमित्रा भावे यांचे चित्रपट राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतही नावाजले गेले. त्यांच्या अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘विचित्र निर्मिती’ या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे.

सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले. याशिवाय राधिका आपटेसारखी दमदार अभिनेत्रीसुद्धा अभिनय क्षेत्राला सुमित्रा भावे यांच्यामुळेच मिळाली.

त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम.ए केलं होतं. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केलं.

सुमित्रा भावेंच्या चित्रपटांना सहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 11 राष्ट्रीय पुरस्कार आणि 45 राज्य पुरस्काराने गौरण्यात आले.

महत्वाच्या बातम्या – 

रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत असलेली रुग्णवाहिका ट्राफिकमध्ये…

मास्क नाही घातलं म्हणून पोलिसांनी जोडप्याला आडवलं तर बाई…

कौतुकास्पद! तहानलेल्या माकडाची अशापद्धतीने तहान भागवली, पाहा…

IPL 2021: दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सनं दमदार विजय, पाॅईंट…

IPL 2021: यंदाची आयपीएल विराट जिंकणार??? आरसीबीच्या विजयाची…