“छत्रपतींचा अपमान करणारे छिंदम प्रवृत्तीचे लोक एकाच पक्षात कसे?”

मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.

रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कोण ओळखलं असतं, असं भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत. परिणामी त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा डाव महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, असा रोष शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहेच. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदास नाहीत, हे वारंवार इतिहासकारांनी स्पष्ट केले आहे. तरीही समर्थ रामदास स्वामींना छत्रपतींचा गुरु म्हणून उल्लेख करुन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

याआधी देखील छत्रपती शिवरायांचा अवमान कधी लेखणीतून, कधी वाणीतून तर कधी कृतीतून झालेला आहे. विशेष म्हणजे अवमान करणारे ‘छिंदम’ प्रवृत्तीचे हे सर्व लोक एकाच पक्षातून येतात, अशी टीका राष्ट्रवादीने ट्विट करत भाजपवर केली आहे.

या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एवढा राग का येत असावा? राजमाता जिजाऊ या शिवरायांच्या गुरु आहेत, असे इतिहासकार आणि छत्रपतींचे वंशज वारंवार सांगत आहेत. तरीही या पक्षाचे लोक हे वारंवार जाहीर व्यासपीठांवरून का नाकारत आहेत, असं त्यात म्हटलंय.

एका महिलेचे कर्तृत्व नाकारण्याची ही ‘संघी’ विचारधारा आपल्यावर का थोपवली जात आहे? असे एक ना अनेक प्रश्न आज महाराष्ट्राला सतावत आहेत. या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन अभ्यासपूर्ण पद्धतीने महाराष्ट्राचा खरा इतिहास आणि सन्मान टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कोश्यारी यांच्या इतिहासातील दाखल्यानं आता राज्यात नवा वाद उद्धवला आहे हे मात्र नक्की.

पाहा ट्विट-


महत्त्वाच्या बातम्या – 

सावधान! कोरोना अजून संपला नाही, लवकरच चौथी लाट येणार; तज्ज्ञांचा दावा

“मी शरद पवारांचं राजकारण नासवलंय, पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे…”

 “राज्यपाल महोदय, छत्रपतींचा अपमान खपवून घेणार नाही, तुमच्या ‘चहा’ छाप सैनिकांनी…”

“…त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री अजून किती दिवस हे सहन करायचं” 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”