मुंबई | गेल्या अनेक दिवसांतून आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी राजकीय नेते शायरीचा आधार घेत आहेत. आज देखील मुख्यमंत्रिपदावर मी पुन्हा विराजमान होईल ही भावना व्यक्त करण्यासाठी ‘मेरा पाणी उतरता देख… मेरे किनारें पें घर मत बसा देना… मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा’ अशा शायरीतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला. मात्र त्यांच्या या शायरीला आणि आशावादाला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे आणि तेही शायरीच्याच माध्यमातून!
दौराने-सफर खुशगवार हों मौसम हमेशा,यह कोई जरूरी तो नहीं….. फैसले तुम्हारे सही ही हों सारे हमेशा,यह कोई जरूरी तो नहीं, अशा शब्दात फडणवीसांच्या आशावादाला मलिक यांनी उत्तर दिलं आहे. पुन्हा तुम्ही येण्याची गरज आहे असं वाटतं नाही, असं शायरीच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मी पुन्हा येईन’…. या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याचा संदर्भ देत आज विधानसभेत बऱ्याच सदस्यांनी हास्याचे फवारे उडवले. त्यावर मी म्हटलं होतं, मी पुन्हा येईन पण मी त्यावेळी टाईमटेबल सांगितलं नव्हतं…. पण काळजी करू नका…मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा’ असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत, नवाब मलिक, आशिष शेलार आणि आज फडणवीस यांनी शायरीच्या माध्यमातून आपल्या भावना सूचकरित्या व्यक्त केल्या आहेत. आता मलिकांच्या या टीकेला फडणवीस काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दौराने-सफर खुशगवार हों मौसम हमेशा,यह कोई जरूरी तो नहीं…
फैसले तुम्हारे सही ही हों सारे, हमेशा,यह कोई जरूरी तो नहीं .… https://t.co/o1IUTpqztQ— Nawab Malik نواب ملک (@nawabmalikncp) December 1, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
महापोर्टल तातडीने बंद करा; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी – https://t.co/FZjWF0jbsU @supriya_sule @uddhavthackeray #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
मै समुंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा….-देवेंद्र फडणवीस – https://t.co/m1QZs8CBr5 @Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
रानू मंडलला स्वत:चंच गाण आठवेना! – https://t.co/YAKY3u13Dd #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019