मुंबई | एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर आली आहे.
शिवसेना आमदार मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे गटात असल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. शिंदे समर्थकांच्या आमदारांमध्ये वाढ होत असून उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडलं असून यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार नवनीत राणा यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दात टीका केली आहे.
नवनीत राणा यांनी त्यांचा मुंबई ते दिल्ली प्रवासातील एक फोटो ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नवनीत राणांनी त्यांचा विमानातील हनुमान चालिसा वाचताना फोटो ट्विट केला आहे.
मुंबई ते दिल्ली विमान प्रवासादरम्यान वाचली हनुमान चालिसा. उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरू, असा घणाघात नवीत राणा यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून उद्धव ठाकरे थोडाच वेळात जनतेशी संवाद साधणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर काय भूमिका मांडणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंचा ‘हा’ निर्णय केला रद्द
“…तर काेणीच मुख्यमंत्री बनणार नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”
‘संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईत या, अन्यथा…’; बंडखोर आमदारांना शिवसेनेचा इशारा
“शिवसैनिकांनो काळजी करू नका, हा बाळासाहेबांचा जिगरी दोस्त अजून म्हातारा झाला नाही”
‘त्या’ दिवशी नेमकं असं काय झालं की शिंदेंनी डायरेक्ट सूरत गाठलं?, खरं कारण आलं समोर