भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करा- नवनीत राणा

पुणे | महात्मा फुलेंनी जिथे मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली त्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करा अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

आज पुण्यात ही मागणी घेऊन मशाल मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच आम्ही मुली आणि महिला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येऊन काम करतोय. त्यांच्यामुळेच महिला आज सन्मानाने स्वावलंबी होऊन जगत आहेत, असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं. 

पुण्याच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौर जर महिला असतील तर त्यांनी पुढे येऊन या मागणीला पाठिंबा द्यावा, असंही त्यांनी म्हटलं.

ज्यांनी महिलांना घडवलं. त्यांच्यासाठी आता महिलांनी पुढं आलं पाहिजे. ते महिलांचं कर्तव्य आहे, असंही मत त्यांनी नमूद केलं. 

राजकारण बाजूला ठेऊन सगळ्या महिलांनी एकत्र येत ही मागणी लावून धरली पाहिजे. महिला म्हणून माई सावित्रींच्या विचारांसाठी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-