“मुख्यमंत्र्यांना जर घराबाहेर पडता येत नसेल तर…”

नवी दिल्ली | संजय राऊत यांनी कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

खासदार नवनीत राणा यांनी नवी दिल्ली येथील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनावरही निशाणा साधला आहे.

खासदारांनाही विचारलं तर त्यांना आघाडी नको आहे. त्यांना युतीच हवी आहे. राऊतांनी बोलणं जर बंद केलं तर शिवसेनेचंच भलं होईल, असं राणा म्हणाल्या.

नगरविकास मंत्र्यांबाबत देखील वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील सर्वात हुशार व्यक्ती आहेत. मुख्यमंत्र्यांना जर घराबाहेर पडता येत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री करावं, असं राणा म्हणाल्या.

ज्या पद्धतीनं शिवसेना भाजपच्या नावानं सत्तेत राहिली. शिवसेना त्यांची नाही झाली तर काँग्रेसची कुठून होणार?, अशी टीका राणांवी शिवसेनेवर केलीये.

काँग्रेसही इतकी लाचार झाली आहे की, इतकं ऐकूनही सरकारमध्ये आहे. त्यांच्या अध्यक्षांबद्दल वाईट बोलूनही ते महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आहेत, असं नवनीत राणा म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ 

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 3 कोटी रुपये 

“काहीतरी गौडबंगाल आहे, लवकरच पेनड्राईव्ह बाहेर काढणार”; नितेश राणे आक्रमक 

 “90% आमदार नाराज, ऐनवेळी शिवसेना-काँग्रेसचे आमदार फोडण्याचा डाव”

काळजी घ्या रे…! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जीव गेला