“शरद पवारसाहेब नसते तर मी कधीही खासदार झाले नसते”

अमरावती | आज मी खासदार आहे ते फक्त शरद पवार साहेबांमुळे आहे. पवारसाहेब नसते तर कदाचित मी कधीही खासदार झाले नसते, असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. त्या अमरावतीत बोलत होत्या.

पवारसाहेब जे बोलतात तेच महाराष्ट्रात होते. त्यांनी जे ठरवले तसेच महाराष्ट्रात घडते, असंही नवनीत राण यावेळी बोलताना म्हणाल्यात.

पवार साहेब जे बोलतात ते महाराष्ट्रात होते. त्यामुळे कॅन्सर रुग्णालयासाठी संसथेने केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. पवारसाहेबांनी मनावर घेतलं तर ते कॅन्सर रुग्णालय येथे होऊ शकेल, असं नवनीत राणा यांनी सांगितलं.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ग्रेट लिडर आहेत. सगळे जण त्यांच्याकडे पाहून राजकारणाची इनिंग सुरु करतात. मला देखील त्यांचा आशीर्वाद लाभला आहे. त्यामुळे मी अमरावतीतील त्यांच्या कार्यक्रमास हजर राहून त्यांचे आशीर्वाद घेणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्यात.

पवारसाहेबांकडून सगळ्यांना अपेक्षा असतात. जिथे ते जातील तिथल्या बाजू भारी असतात, आम्ही आमच्या अडचणी पवारसाहेबांच्या कानावर टाकू असंही त्या म्हणाल्या.

2019 नंतर अमरावतीत आलेल्या पवारसाहेबांचे मी स्वागत केलं. खूप मोठे नेते आज अमरावती दौऱ्यावर येताहेत. लोकांच्याही खूप अपेक्षा असतात, असं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राजकारण करण्याच्या नादात आपले संस्कार विसरून गेलेत” 

“मातोश्रीत बसलेल्यांनी सभेला लाखोंची गर्दी जमवून दाखवावी” 

सिनेसृष्टीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम यांचं निधन 

“वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत” 

“माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचं नुकसान करतायेत”