मुंबई | खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा आता दिल्लीतून उद्धव सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत.
राणा दाम्पत्य दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहे. यावेळी नवनीत राणा यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना नवं चॅलेंज दिलं आहे.
माझा मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे दात तोडण्याची एवढी ताकद असेल तर औरंगजेबच्या कबरीवर ज्यांनी फूल अर्पण केलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडलं आहे. हिंमत असेल तर त्यांचे दात तोडून दाखवा, असं नवनीत राणा म्हणाल्यात.
मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या टीझरमध्ये ज्या प्रमाणे दात तोडण्याचं दाखवण्यात येत आहे. जर एवडी ताकद ताकद आहे तर त्यांची दात तोडून दाखवा तर आम्ही मानतो असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांना आणि शिवरायांना मानणारा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवर हार अर्पण करतात. सगळ्यात मोठा गुन्हा या लोकांनी केला आहे, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईतील सभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता लवकरच…
चिंतन शिबीर सुरू असतानाच काॅंग्रेसला जोर का झटका; ‘या’ मोठ्या नेत्यानं सोडला पक्ष
“बुस्टर डोस माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”
“ज्यांनी बोलायला पाहिजे ते तर मोदींचे दास झालेत”
‘महिला असलीस तरी छपरीच तू’; राष्ट्रवादीकडून केतकीवर जहरी टीका