मुंबई | खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.
शिवसैनिकांनी मुंबईत राडा घातल्याने अखेर राणा दाम्पत्याने आंदोलन मागे घेतलं. मात्र, त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्यास अटक केली. त्यांच्यावर आज प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राणा दाम्पत्यानं केलेल्या जामीन अर्जावर 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. अशातच आता नवनीत राणा यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
हनुमान चालिसा वाचणे पाप आहे का?, कलम 124 (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की, हनुमान चालिसा पाठ करण गुन्हा आहे का? असेल तर आम्हाला फाशी द्या, असं ट्विट नवनीत राणा यांनी केलं आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्य प्रकरण आणि नंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरावरील हल्ला प्रकरणानंतर आता वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांनी जशास तसं उत्तर देणार असल्याचं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘प्रत्येक कट उधळला जातोय, भाजपला राज्यात…’, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
“मैं करू तो साला, कॅरेक्टर ढीला है”, अमृता फडणवीसांचा खोचक टोला
मोठी बातमी! राणा दाम्पत्याला न्यायालयाचा दणका