भाजपवाल्यांनो, तुम्ही मोर्चाचं नियोजन तर केलंय कार्यकर्ते तर बिळात शिरलेत- नवाब मलिक

मुंबई| महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी भाजपतर्फे 25 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयांबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सांगितले होते.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

याबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना मलिक म्हणाले, ‘भाजप 25 फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात मोर्चा काढणार आहे. पण त्यासाठी कायकर्ते कुठून आणणार, आंदोलनासाठी भाजप पैसा देवून लोकं आणणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘पुन्हा निवडणूका होऊं द्या. पाच वर्षांनी निवडणुका होतील, तेव्हा भाजपच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल,’ असा दावा नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना केला. ‘सत्ता गेल्यामुळे भाजपकडे आता कार्यकर्ते उरलेले नाहीत. कमळाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली आहे,’ असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-वादग्रस्त वक्तव्यं टाळा; लक्षात ठेवा सरकार पाच वर्ष टिकवायचंय- शरद पवार

-इंदुरीकरांच्या सांगण्यावरुन मला अनेकांनी धमक्या दिल्या- तृप्ती देसाई

-इंदुरीकर महाराज संतापले… म्हणाले आता तरी बंद करा रे!!

-इंदुरीकर महाराजांविरोधात अखेर तृप्ती देसाईंनी उचललं मोठं पाऊल!

-“इंदुरीकरांच्या कीर्तनात कीर्तन कमी आणि तमाशाच जास्त असतो”