मुंबई | राज्याचे मंत्री आणि अवैध मालमत्ता प्रकरणी सध्या ईडीच्या ताब्यात असलेले नवाब मलिक हे सध्या आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत.
मलिकांनी न्यायालयात आपल्याला खाजगी रूग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी अशी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयानं परवानगी दिली होती.
आता प्रत्यक्षात नवाब मलिक यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अटकेत असलेल्या मलिकांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
मलिक यांच्यावर आता खाजगी रूग्णालयात किडनी आणि इतर आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. परिणामी वादाला देखील तोंड फुटलं आहे.
मलिका यांना कुर्ला येथील क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असले तरी त्या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे.
मलिक यांच्या उपचारावेळी रूग्णालयाबाहेर तैनात पोलिसांचा खर्च हा नवाब मलिकांना करावा लागेल, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. मलिक हे सध्या मंत्री पदावर कार्यरत आहेत.
दरम्यान, नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जामीनासाठी याचिका दाखल केल्या होत्या. पण न्यायालयानं हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत जामीन अर्ज फेटाळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
संभाजीराजेंचा राज्यसभा मार्ग खडतर?, शिवसेनेनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल
अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला ‘हा’ गंभीर इशारा
रोहित पवारांच्या खोचक टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ एका निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ
शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ नेत्याने दिला राजीनामा