…तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल; नवाब मलिकांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

मुंबई  : ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यालाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे. तसं असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल, असं म्हणत नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप दावा करत होतं की आमच्याकडे 119 आमदार आहेत. त्यांचे 105 आणि मित्र पक्षाचे 14. मात्र आता  तशी परिस्थिती नाही. अनेक आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसमध्ये यायचं आहे. पण आम्हाला फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही. आम्ही फोडोफोडीचं राजकारण केलं तर भाजप पूर्ण रिकामं होईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महापुरूषांबद्दल आम्हाला आदर आहे. पण शपथविधी हा शपथविधी असतो, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-