सचिन अहिरांनी ‘राम राम’ करताच राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड!

मुंबई |  राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज (गुरूवार) मनगटावरचं घड्याळ काढत शिवबंधन बांधणं पसंत केलं. त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर सोपवली आहे.

स्वत: निवडणून येण्याचा विश्वास आणि ताकद नाही म्हणून सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मुंबईत पक्षाची अजिबात वाढ झाली नाही. पण मी पूर्ण ताकदीने पक्षकार्यासाठी वाहून घेईल आणि पक्षाला चांगले दिवस दाखवण्यासाठी काम करेल, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

येत्या काळात नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांसोबत बोलून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर योग्य प्लॅन आखला जाईल. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद वाढावी, यासाठी देखील विशेष नियोजन आखलं जाईल, असंही ते म्हणाले.

सचिन अहिर यांच्यावर पक्षाने खूप विश्वास ठेवला होता. पण त्यांनी पक्षाशी गद्दारी करत विश्वासघात केला. पण त्यांचं त्यांना लखलाभ…. शिवसेनेच्या तीन जागा आम्ही कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिलं.

सचिन अहिर यांचा स्वत:वर विश्वास नव्हता. परंतू शिवसेनेने पडणारा नेता नेला, असा निशाणा त्यांनी अहिरांबरोबर शिवसेनेवर साधला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं बळ माझ्या शरीरात असेल आणि पवार ह्रदयात असतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवेशानंतर अहिर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेने पडणारा नेता नेला- नवाब मलिक

-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला धक्का; हा आमदार भाजपच्या गळाला??

-भाजप प्रवेशाला नाही म्हटले म्हणूनच मुश्रीफांच्या घरावर धाड??

-“मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत”

-“विधानसभेला तरूणांची मला 15 नावे द्या… मी त्यांना उमेदवारी देतो”