Top news महाराष्ट्र मुंबई

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…

nawab 4 e1645624598847
Photo Credit- Facebook/nawab malik

मुंबई | मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या ईडीच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांनी एक एक खळबळजनक माहिती त्यांनी दिलेल्या जबाबातून उघड झाली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असा जबाब मलिक यांनी ईडीला दिल्याची माहिती समोर आली आहे.

2002 सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता, अशी माहिती नवाब मलिक यांनी ईडीला दिलेल्या जबाबात नमूद असल्याची माहिती आहे.

फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला नवनवीन आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

दाऊद आपला भाऊ इक्बाल कासकरसह त्याच्या भावंडांना आणि नातेवाइकांना दर महिन्याला 10 लाख रुपये पाठवत असल्याची माहिती ईडीला समजली आहे. इक्बाल कासकरलाही ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचा झटका 

सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा आणखी एक मोठा निर्णय