मुनगंटीवारांना हे शहाणपण आधी का सुचलं नाही?- नवाब मलिक

औरंगाबाद | शिवसेनेनं प्रस्ताव दिल्यास आजही भाजप शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहे, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

हे शहाणपण आधी का सुचलं नाही? असा सवाल करत नवाब मलिक यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

कमळाबाईला शिवसेनेनं कधीच सोडलं आहे. भाजपची इच्छा आहे. मी येतो-येतो पण आता शिवसेनेच्या हातात आहे. त्यांना सोबत घ्यायचं की नाही. ते निर्णय घेतील, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. सुधीर मुनगंटीवार यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याची इच्छा आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती

-ठाकरे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही; या नेत्याचा घणाघात

-मी उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार… ते मंदिर बांधतील, मी मशीद बांधेन; आझमी पुत्राचा एल्गार

-“आदित्यसाहेब, आता फक्त म्हातारीच्या बुटाचा हट्ट करू नका म्हणजे मिळवलं”

-मी तर माझी बॅग पॅक करून ठेवली होती पण…..- रोहित शर्मा