उदयनराजेंच्या भाजप प्रवेशासंबंधी मलिकांचा खळबळजनक गौप्यस्फोट!

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिन विक्रीसाठी उदयराजेंनी भाजपत प्रवेश केला, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसलेंवर केला आहे.

जमिन विक्रीसाठी परवानगी देण्याचं आमिष उदयराजेंना भाजपने दाखवलं असेल तर हा प्रयत्न राष्ट्रवादी हाणून पाडेल, असा इशारा मलिक यांनी दिला आहे.

शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे. जर त्याला कोणी धक्का लावत असेल तर जनतेला सोबत घेऊन त्याला कडाडून विरोध करू, असंही मलिक म्हणाले.

साताऱ्यातील किंवा अन्य कोणत्याही संस्थानातील जमिन कायद्याने विकता येत नाही. स्वत:साठी वापरता येत  नाही. या जागा विकण्याच्या अमिषापोटी भाजप राजे आणि संस्थानिकांना भाजपमध्ये आणत आहे, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर 1999 मध्ये उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात पराभूत केलं होतं. आता परत करू, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-