“किरीट सोमय्यांना म्हैस दूध देतेय हे दिसतच नाही, ते नेहमी शेणंच पाहतात”

मुंबई | बीएमसीने उभारलेल्या कोविड सेंटरच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा घणाघाती आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्यांनी केलेल्या या आरोपाला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्यांनी शनिवारी गोरेगावमधील नेस्को कोविड सेंटरची पाहणी केली. आर्थिक कमाईसाठी लोकांना घाबरवून कोविड सेंटरमध्ये आणून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप यावेळी किरीट सोमय्यांनी केला होता.

किरीट सोमय्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सणसणीत टोला लगावला आहे. किरीट सोमय्यांचं लक्ष शेणाकडेच जातं, अशी टीका मलिकांनी केली आहे.

कोविड सेंटरमुळे अनेकांचे जीव वाचत आहेत. एकही रूग्णाचा उपचाराशिवाय किंवा ऑक्सिजनशिवाय मृत्यू होत नाही. याउलट गुजरातमध्ये कोरोनाबाधितांचे खरे आकडे लपवून ठेवले जात आहे, अशी टीका नवाब मलिकांनी केली.

98 टक्के रूग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील 99.99 टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावा देखील किरीट सोमय्यांनी केला होता.

किरीट सोमय्या कधीच म्हैस दूध देते याकडे बघत नाहीत, त्यांचं लक्ष नेहमी शेणाकडेच जातं, असा घणाघात नवाब मलिक यांनी केला आहे. विरोधकांना लोकांचा जीव महत्वाचा नसल्याची टीका देखील नवाब मलिक यांनी केली आहे.

राज्य सरकारने शाळा बंद करून बार सुरू ठेवले, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. नवाब मलिक यांनी सदाभाऊ खोत यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

राज्य सरकराने शाळा बंद करून बार सुरू ठेवले असं सदाभाऊ खोत म्हणतात. मात्र केंद्र सरकारनेच लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

देशात पहिल्या लॉकडाऊन नंतर केंद्र सरकारनेच सर्वात आधी दारूची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खोत यांनी शाळा बंद करून बार का सुरू केले, याचा जाबही पंतप्रधानांना विचारला, अशी टीका नवाब मलिकांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐकून आश्चर्य वाटेल पण ‘या’ पठठ्याने एका बॉलमध्ये काढले चक्क 7 रन, पाहा व्हिडीओ

“ठाकरे सरकारचं गांजावर गजब प्रेम आहे”

एसटी बसचा चक्काचूर!, काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

बाहुबली फेम कट्टपालाही झाली कोरोनाची लागण, अभिनेते सत्यराज रूग्णालयात दाखल

पुढील काही दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता