मुंबई | गेल्या काही दिवसापासून राज्याचं राजकारण ड्रग्ज प्रकरणी फिरताना दिसत आहे. समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता नवाब मलिकांनी आपला मोर्चा आता भाजपकडे वळावला आहे. त्यामुळे आता भाजप नेते देखील आक्रमक झाले आहेत.
नवाब मलिकांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं अंडरवर्ल्डशी नातं असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मलिकांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर नलिकांनी देखील फडणवीसांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेते आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुड गोईंग म्हणत मलिकांचं कौतुक केलं आहे. तर संजय राऊतांनी देखील फडणवीसांवर हल्लाबोल करत मलिकांचं कौतुक केलं.
अशातच आता भाजप नेते नितेश राणे यांनी नवाब मलिकांना निशाण्यावर घेत हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मलिक आरोप आणि दावे करताना दिसत आहेत. नवाब मलिक हा गद्दार आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी मलिकांवर टीका केली आहे.
अतिरेक्यांना साथ देणारा नवाब मलिक हा देशद्रोही आहे. त्याच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नये, असंही नितेश राणे म्हणाले आहे. त्यासोबत त्याला पाकिस्तानात हकलून द्या, अशी जहरी टीका देखील नितेश राणे यांनी केली आहे.
नवाब मलिक मंत्रीमंडळात आहेतच कसे?, असा सवाल देखील नितेश राणेंनी विचारला. तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी देखील नितेश राणे यांनी यावेळी केली आहे.
त्याचसोबत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. आता ते चांगले असल्याचं त्यांनी म्हटलं.
मात्र डाॅक्टरांनी एक संशोधन करून या माणसाला कणा आहे का? हे तपासण्याची गरज आहे, असंही नितेश राणे यांनी म्हणाले आहेत.
सदाभाऊ खोतांना मच्छर चावतात असा इंटरव्यूह चालवला. सदाभाऊ खोतांना माझं आवाहन आहे की दोन ते तीन बाटल्या मच्छरांच्या भरून घ्या. त्या अनिल परब यांच्या घरी सोडायच्या आहेत, असंही नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, नितेश राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचं देखील आवाहन केलं आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या टीकेला आता मलिक काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अनिल देशमुखांना मोठा धक्का! ईडी कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ
कडक सॅल्युट! भर पावसात महिला अधिकाऱ्यानं तरुणाला खांद्यावर उचलून नेत वाचवले प्राण
“जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात”
“कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, ओव्हर डोस घेऊन जास्त बोलतीये”
“कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या, लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी”