मुख्यमंत्री फडणवीस मस्तवाल झालेत- नवाब मलिक

मुंबई |  पुण्यात आणि नाशिकात झालेल्या पावसाने हाहाकार उडाला आहे. त्यात आतापर्यंत 12 जणांचा दुर्देवी बळी गेला आहे. याचं मुख्यमंत्र्यांना काहीही पडलेलं नाहीये. मुख्यमंत्री फडणवीस मस्तवाल झालेत, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे आणि नाशिक येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.  ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना परस्थितीचं भान नाही. ते परिस्थिचीचं गांभीर्य जाणतं नाहीत पुण्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना ते दिल्ली आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

पुणे आणि नाशकातली परिस्थिती हाताळण्याचे काम मुख्यमंत्र्यांचं आणि पालकमंत्री यांं आहे. पण हे लोक मात्र दिल्लीत जावून बसले आहेत. यांना पक्त निवडणूक महत्वाची आहे, अशी टीका मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, जनतेचं गांभीर्य नसलेल्या सरकारला आता जनताच धडा शिकवेल, असं मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-