…तर पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल- नवाब मलिक

मुंबई |  अजित पवार यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करून 80 तासांत केंद्राचे 40 हजार रूपये कोटी वाचवल्याचा दावा भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे. त्यावर अनंत कुमार हेगडेंचे आरोप खरे असतील तर पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल, असं राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. देवेंद्र फडणवीसांनी 15 तासांत हा निधी केंद्राकडे पाठवला, असा खळबळजनक गौप्यस्फोट हेगडे यांनी केला आहे.

अनंत कुमार हेगडे यांच्या बोलण्याची शहानिशा करावी लागेल. केंद्राकडून सावत्र भावासारखी वर्तणूक देण्यात येते, असं यापूर्वीच केंद्रावर खापर फोडण्यात आलं होतं आणि आता ते हे स्पष्ट होताना दिसतंय, असं मलिक यांनी म्हटलंय.

दुसरीकडे, मी केंद्राला एकही पैसा परत केलेला नाही. राज्याच्या अर्थ विभागाने हे सत्य समोरं आणावं, असं म्हणत फडणवीसांनी हेगडेंचा दावा फेटाळून लावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-