अजूनही देशात नथुराम गोडसेंची मानसिकता जिवंत आहे- नवाब मलिक

नवी दिल्ली | गुरूवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठात CAA विरोधी आंदोलन सुरू असताना रामभक्त वर्मा नामक तरूणाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये एक आंदोलक जखमी झाला असून त्याला रूग्णालयामध्ये दाखल केलं आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने समाजाच्या विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

आंदोलकांना गोळी मारा असं वक्तव्य भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं होतं आणि कालच जामियामध्ये गोळीबाराची घटना घडली, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. ही घटना निषेधार्ह असल्याचं मत मलिक यांनी व्यक्त केलं आहे.

भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमुळे देशआतील माहोल बिघडतोय, असं म्हणत अजूनही देशात गोडसेंची मानसिकता जिवंत आहे, असं परखड मत मलिक यांनी व्यक्त केलं आहे.

दुसरीकडे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीदिनीच दिल्लीत आंदोलकांवर एक माथेफिरू पोलिसांसमक्ष बिनधास्त गोळ्या झाडतो हे अत्यंत निषेधार्ह आहे, असं त्यांनी ट्वीटरद्वारे म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-CAA कायद्यामुळे महात्मा गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालं- राष्ट्रपती

-आज असा नटलाय… लग्नात पण एवढा नटला नसशील; दादांच्या तुफान फटकेबाजीने उडाले हास्याचे कारंजे

-जालन्यात टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण; पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय??

-आम्हाला देशभक्ती पाहिजे… दारूभक्ती नको- डॉ. अभय बंग

-कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा