मुंबई | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर प्रहार केला. त्यांच्या टीकेला ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला ‘सर्कस’ म्हणतात, अशा शब्दात महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगलं काम करत आहे. कोरोनाबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने कौतुक केले आहे. राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला ‘सर्कस’ असे संबोधतात. अनुभवाचे बोल… असं ट्विट करत त्यांनी राजनाथ सिंह यांच्यावर पलटवार केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडे जे विकासाचं व्हिजन असायला हवं ते अजिबातच नाहीये. महाराष्ट्राकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की या राज्यात सरकारच नाहीये. परंतू असं असलं तरी सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, महाराष्ट्रात ज्या प्रकारे कोरोनाचा उद्रेक होतो आहे, तो चिंतेचा विषय आहे, अशी टीका करत अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारला जी कोणती मदत लागेल ती मदत केंद्र सरकार करेल, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली.
महाराष्ट्र में लोकतांत्रिक ढंग से चलने वाली सरकार अच्छा काम कर रही है
Covid 19 को लेकर ICMR ने मुम्बई मॉडल की प्रशंशा की है
केंद्रीय मंत्री @rajnathsingh जी रिंग मास्टर के हंटर से चलने वाली सरकार के मंत्री लोकतांत्रिक ढंग से चलने वाली सरकार को सर्कस बोल रहे हैं।
“अनुभव के बोल “— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) June 9, 2020
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्राने कोरोनाची लढाई कशी लढावी ते कर्नाटक आणि उ. प्रदेशकडून शिकावी- राजनाथ सिंह
-….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे
-सोनू तू राऊतकडे लक्ष देऊ नको, आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही- चित्रा वाघ
-‘कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र…
-महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये; राजनाथ सिंह महाविकास आघाडीवर बरसले