संजय राऊतांच्या ट्वीट ‘रेसीपी’ला नवाब मलिकांची फोडणी!

मुंबई |  महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिवसेनेबरोबर चांगलंच सूत जुळाल्याचं दिसून येतंय. संजय राऊतांनी  दररोज सकाळी भाजपला टोला लगावणारं ट्वीट करायचं आणि त्या ट्वीटला रिट्वीट करून मलिकांनी त्याच्यात आणखी भर टाकायची… आता हे नित्याचं झालंय!

रविवारी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेला फडणवीसांनी टोमणे मारले. त्यावर, शेठ जिनके घर शीशे के होते हैं वो दुसरे कें घर पत्थर नहीं फेका करते, असं ट्वीट करत संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. त्यात आणखी भर टाकली ती राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी!

बस एक ही ठोकर से गिर जाएँगी दीवारें… आहिस्ता ज़रा चलिए शीशे के मकानों में … असं ट्वीट करत संजय राऊत यांना जरासा संयम ठेवण्याचा सल्ला मलिकांनी देत भाजपला टोला लगावला आहे.

दरम्यान, रविवारी विधानसभेत काळजी करू नका… मैं समुंदर हूँ…. लौटकर वापिस आऊंगा, अश्या शायरीतून परत येणारच, असा निर्धार व्यक्त करत फडणवीसांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-