पत्रकार परिषदेआधी नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ट्विटनं खळबळ!

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

पत्रकार परिषदेच्या आधी नवाब मलिक यांनी एक ऑडियो क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि NCBचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि NCBचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद आहे. यात सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. हिंदी भाषेतील हा संवाद आहे.

मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले. यानंतर नवाब मलिक त्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हणत मी रवीवारी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं.

मोहित कंबोज यांनी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे यासर्व पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती उघड करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भाजप नेत्यांनीही मलिक यांच्याविरोधात आरोप सुरू केले.

मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्यावर मलिक यांनी मोहित कंबोज हे समीर वानखेडे यांच्या आर्मीचा सदस्य असून पत्रकार परिषदेत खोटे आरोप केले आहेत.  मी या प्रकरणी सत्य सर्वांसमोर आणणार असल्याचं नवाब मलिक यांनी कंबोजच्या पत्रकार परिषदेनंतर म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सुनील पाटील हे मास्टरमाईंड असून त्यांचा राष्ट्रवादीशीसंबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. 20 वर्षांपासून त्यांचे राष्ट्रवादी पक्षासोबत संबंध राहिले आहे, असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय.

 

महत्त्वाच्या बातम्या-

“भाजपने सरकारी कंपन्यांप्रमाणे तपासयंत्रणा आणि तुरुंगांचंही खासगीकरण केलंय” 

राकेश झुनझुनवाला यांनी सर्वांना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

“तुमचा परफॉर्मन्स दाखवा, नाहीतर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं” 

भाजप नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट, ड्रग्ज प्रकरणात ट्विस्ट? 

…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ