मुंबई | अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध या निवडणुकीच्या निमीत्तानं रंगलं होतं.
2008 पासून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे गटाचं वर्चस्व आहे. गतवेळी मात्र शिवसेनेचे सतीश सावंत हे विजयी झाले होते. परिणामी यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची होती.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या 19 जागांसाठीपैकी राणे गटाला 11 जागांवर विजय मिळाला तर महाविकास आघाडीला अवघ्या 8 जागा मिळवता आल्या. विशेष म्हणजे बॅंकेचे मावळते अध्यक्ष सतिश सावंत यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमीत्तानं राज्याला पाहायला मिळाला होता. विजयानंतर राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
नारायण राणे यांच्या टीकेेला महाविकास आघाडीकडून राष्ट्रावादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
गल्लीत क्रिकेट जिंकणारे विश्वचषक जिंकू असं म्हणत आहेत, असं म्हणत मलिक यांनी नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिलं आहे. परिणामी आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून भाजपला पराभूत करू शकले नाहीत. राणे कुटुंबाला विनाकारण त्रास देण्यात आला, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक ही अनेक कारणांनी गाजली होती. महाविकास आघाडीचे पॅनलप्रमुख सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाल्यानं मोठा वाद उभा राहिला होता.
संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे हे सध्या पोलिस अटकेच्या पार्श्वभूमीवर अज्ञातवासात गेले आहेत. परिणामी शिवेसेनेकडून राणेंवर जोरादार टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, कोकणच्या विकासात सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. परिणामी राणे यांच्या माध्यमातून बॅंकेचा कारभार व्यवस्थित पाहीला जाईल, असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…
“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”
“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”
‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती
गुड न्यूज! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त