मुंबई | अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा खळबजनक आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाचा आणखी भांडाफोड केला. आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत: गेला नाही. त्याला बोलावलं गेलं. प्रतिक गाभा आणि ऋषभ सचदेवने त्याला पार्टीला बोलावलं होतं, असं नवाब मलिकांनी म्हटलंय.
कंबोजच्या साल्यामार्फत हा खेळ खेळला गेला. किडनॅपिंगचा मास्टर माइंड दुसरा तिसरा कुणी नसून मोहीत कंबोज आहे. तो खंडणीवसूल करतो. समीर वानखेडेशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो 12 हॉटेल चालवतो असा दावा मलिक यांनी केला.
7 तारखेला वानखेडे आणि कंबोज ओशिवरा स्मशानभूमी जवळ भेटले होते. तिथल्या लोकांनी मला सांगितलं. मात्र, त्यांचं नशीब चांगलं होतं की पोलीसांचं सीसीटीव्ही बंद होतं. त्यामुळे व्हिडीओ मिळाला नाही. त्यानंतर वानखेडे घाबरून गेले आणि त्यांनी कोणी तरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली, असं मलिकांनी सांगितलं आहे.
ड्रग्जचा धंदा सुरू राहावा हेच वानखेडेंना वाटतं. बॉलिवूडमध्ये कोण ड्रग्ज घेतं याची माहिती घेऊन वानखेडेंनी दहशत निर्माण केली, असं मलिक यांनी सांगितलं.
मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. पूर्वीच्या काँग्रेसच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याच्या मागे मागे कंबोज फिरायचा. कंबोजने 1100 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे, असंही मलिकांनी सांगितलं आहे.
सरकार बदलल्याने तो भाजपत गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचं पद दिलं. या घोटाळ्याप्रकरणी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झालं, असा दावाही नवाब मलिकांनी केला आहे.
ललित हॉटेल सात महिने बुक होती. तिथूनच प्रायव्हेट आर्मी तिथून काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा अनेक लोक येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरू होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. वानखेडेच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असंही मलिक म्हणाले.
दरम्यान, हे काही मेरा नाम जोकर आणि संगम या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीयेत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“भाजपने सरकारी कंपन्यांप्रमाणे तपासयंत्रणा आणि तुरुंगांचंही खासगीकरण केलंय”
राकेश झुनझुनवाला यांनी सर्वांना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
“तुमचा परफॉर्मन्स दाखवा, नाहीतर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं”
भाजप नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट, ड्रग्ज प्रकरणात ट्विस्ट?