मुंबई | जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.
बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार याची चर्चा होत नाही. परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करतील. कुणालाही याच्यातून बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करायचा आहे. यादृष्टीने शरद पवार काम करत आहेत, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
या देशात विविध प्रश्न निर्माण झाल्यावर ज्यापध्दतीने युपीएच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे. आम्हाला या देशात ममतादीदी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामूहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जी या दोन दिवसाच्या दौर्यावर असताना त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमच्या मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाचं वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचं मत मांडलं.
पवारसाहेबांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे, असं देखील मलिक यांनी सांगितलं.
राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असं कधी कुणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तशीच परिस्थिती या देशात होणार आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांना, लाखाचे झाले असते 72 लाख
मोदींची स्तुती करणं विद्यार्थ्यांला पडलं महागात; विद्यापीठाने केलं असं काही की…
पोस्टाची बंपर योजना; लेकीच्या 18 व्या वर्षी मिळतील ‘इतके’ लाख
झेब्र्याला राग आला अन् थेट जंगलाच्या राज्यासोबतच भिडला, घडवली चांगली अद्दल, पाहा व्हिडीओ
“काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे”