‘…ते प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन दाबण्यात आलं’; मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई | 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली. तेव्हा मोदी म्हणाले, दहशतवाद खतम होईल. काळापैसा बंद होईल. बनावट नोटा संपवण्यासाठी नोटबंदी करण्यात येत आहे. नोटबंदी नंतर संपूर्ण देशात 2000 आणि 500 च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. तसेच तामिळनाडू, पंजाबत कारवाई होत होती मात्र 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात एकही बनावट नोटा पकडण्यात आल्या नाही. कारण फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता, असा गंभीर आरोप मंत्री नवाब मलिकांनी केला आहे.

8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली, असं मलिकांनी सांगितलं आहे. तसेच बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत आहे, असंही ते म्हणालेत.

महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभर एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत. कारण, या सगळ्या रॅकेटला देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद होता, असं नवाब मलिक यांनी म्हटले.

एनसीबीच्या खंडणीप्रकरणावरून फडणवीस लक्ष विचलीत करत आहेत. जे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना सर्व लोकांना सरकारी कमिशन, सरकारी बोर्डाचा अध्यक्ष का केलं?, असा सवालही त्यांनी केलाय.

मुन्ना यादव नागपूरचा कुविख्यात गुंड, त्याच्यावर हत्येचे अनेक गुन्हे, तो तुमचा साथी आहे. त्या मुन्ना यादवला कन्स्ट्रक्शन वर्क्स बोर्डाचा सदस्य बनवलं होतं की नाही. तुमच्या गंगेत अंघोळ करून मुन्ना यादव पवित्रं झाला का?, असं म्हणत मलिकांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

हैदर आजम बांगलादेशींना साथ देतो. त्याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. मालाड पोलीस त्याची चौकशी करत आहे. बंगाल पोलिसांनी कागदपत्रं खोटे आहेत असं सांगितलं. तुमच्या कार्यालयातून पोलिसांना फोन गेला. ते प्रकरण दाबलं की नाही?, असा सवालही मलिकांनी विचारलाय.

अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कसा पोहोचला? सहार विमानतळावर रियाज भाटीला दोन बनावट पासपोर्टनिशी पकडण्यात आलं होतं. त्याला जामीन कसा मिळाला? देवेंद्र फडणवीसांचे रियाज भाटीशी संबंध काय? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी गुन्हेगारी जगताशी फडणवीसांचे कसे संबंध आहेत याची पोलखोल केली.

महत्वाच्या बातम्या- 

 ‘उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है’; मलिकांचा फडणवीसांना इशारा

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर 

“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”