गोपिचंद पडळकरांच्या उमेदवारीला आम्ही आव्हान समजत नाही- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई : भाजपकडे उमेदवार नसल्यामुळेच गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा बळीचा बकरा करण्यात आला आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं आहे. 

चंद्रकांत पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून बारामतीमध्ये तळ ठोकून होते. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की ते बारामतीतून लढतील पण ते उभे राहिले नाही आणि पडळकरांचं नाव पुढे केलं. पडळकर यांच्या उमेदवारीला आम्ही आव्हान समजत नाही. भाजपकडे प्रबळ उमेदवार नसल्यामुळेच वंचितचा उमेदवार त्यांना घ्यावा लागला आहे, अंसही नवाब मलिक म्हणाले आहेत. 

गोपीचंद पडळकरांची जर मान्यता असेल तर मी पक्षाशी बोलतो. पडळकरांना बारामतीमधून उतरवून बारामतीत आपण जिंकून दाखवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यावर नवाब मलिक यांनी पडळकरांना बळीचा बकरा केलं असल्याचं म्हटलं. 

ही तुल्यबळ लढत होईल. पडळकर चांगली फाइट देतील. बळीचा बकरा कोण हे लवकरच कळेल, असं भाजप प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले आहेत.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना बळीचा बकरा केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-