‘क्रांती रेडकरची बहीण….’; नवाब मलिकांचा आणखी एक गंभीर आरोप

मुंबई | मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या मेव्हणीवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

समीर वानखेडेंची पत्नी- अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे ट्विट केली आहेत.

काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. त्यानंतरही नवाब मलिक यांच्याकडून आरोप करणं सुरूच आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एकामागून एक गौप्यस्फोट करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता.

ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमवारी याबाबत सुनावणी होणार आहे.

प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अर्शद शेख हे त्यांचे वकील आहेत.

दरम्यान, रविवारी नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज प्रकरणी धक्कादायक खुलासे केलेत. ललित हॉटेल सात महिने बूक होतं, अशी माहिती नबाव मलिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

समीर वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली तसेच सॅम डिसुझा असे अनेक जण येत होते. तिथे ड्रग्ज घेतले जात होते, असंही त्यांनी सांगितलं.

माझे आरोप खोटे आहेत सांगत समीर वानखेडे आता हसत आहेत. पण नंतर ते रडणार आहेत. सत्यमेव जयतेच होणारे, असंही नवाब मलिक म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा” 

येत्या 24 तासात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

  25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल!