“पंतप्रधान मोदींचे आरोप खरे निघाले तर राजकारण सोडू”

मुंबई : नाशिमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पाकिस्तानची स्तुती करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलंय.

पवारांचं संपूर्ण भाषण तपासून पाहा, त्यात असं काही निघालं तर आम्ही राजकारण सोडू असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांची भूमिका ही भारत विरोधी आहे. पण तिथले सामान्य नागरिक हे भारताचा व्देष करणारे नाहीत असं शरद पवार म्हणाले होते. त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात येत आहे असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, जम्मू-काश्मीर संदर्भात असो की पाकिस्तान बाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील शेजारचा देश चांगला वाटतो. दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या-