नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर लेटर बॉम्ब; केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई | मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर आणखी आरोप केला आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र दिलं आहे. त्यात समीन वानखेडेंच्या एकूण 26 फ्रॉड केसेसच्या उल्लेख आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा बॉम्बगोळा टाकला आहे. मला एक पत्रं मिळालं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने हे पत्रं पाठवलं. दोन दिवसांपूर्वीच मिळालं. त्याची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डीजी, काँग्रेसच्या अध्यक्षांनाही ही प्रत त्या व्यक्तीने दिलं आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

एनसीबीने चौकशी सुरू केली आहे. त्यांना हे पत्रं पाठवणार. त्यात 26 केसेसची माहिती दिली आहे. त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहोत. एनसीबीच्या कार्यालयात एक ग्रुप तयार झाला आहे. खोटी प्रकरणं तयार केली जात आहेत. प्रामाणिक अधिकाऱ्यांना डावललं जात आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक माहिती उघड आहे. एनसीबीच्या अंतर्गत हा मामला आहे. ते चौकशी करतील, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

पती, पत्नी आणि वडिलांना या प्रकरणात घेतलं जात असल्याचं सांगितलं जातं. पण आम्ही कोणतीही चुकीची गोष्ट किंवा अभद्र गोष्ट केली नाही. मी फक्त जन्म दाखला पोस्ट केला. मी हिंदू मुस्लिम हा मुद्दा कधीच केला नाही. भाजपने उलट त्याला धार्मिक रंग दिला. मी 45 वर्ष राजकारणात आहे. पण धर्माच्या नावावर राजकारण केलं नाही, असं मलिक यांनी म्हटलंय.

आमची लढाई एनसीबीशी नाही. गेल्या 35 वर्षात एनसबीने देशात चांगलं काम केलं आहे. कधीही या संस्थेवर कोणी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं नाही. पण एक व्यक्ती फर्जीवाडा करून सरकारी नोकरीत येतो. त्याचा खुलासा मी केला आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली ‘ही’ भेट!

येत्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का?; जयंत पाटलांच मोठं वक्तव्य म्हणाले…

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठा बदल, वाचा आजचा दर

मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका- समीर वानखेडे

मागासवर्गीय असल्यानेच समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातंय- रामदास आठवले