पवारांवरील कारवाईत आमचा हात नाही- रावसाहेब दानवे

मुंबई | राज्य सहकारी बँक प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर इडीने केलेली कारवाई ही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे, याचा भाजपशी कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

तपासामध्ये एकेक मासे अडकत गेले, गुन्हा कोणावर दाखल झाला यापेक्षा गुन्हा का दाखल झाला हे महत्त्वाच आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळापासून या प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. कोण अडकतो याला महत्त्व नाही तर का अडकतो याला महत्त्व आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

ज्या साखर कारखानदारांनी पैसे बुडवले त्यांनीच ते विकत घेतले आणि बॅंकेने त्यांनाच कर्ज दिले. हा राज्यातील जनतेवर अन्यायच आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. 

जसजशी चौकशी पुढे गेली तसतसे लोक अडकत गेले. पवारांवर झालेली कारवाई हि सूडबुद्धीने झालेली नसून ती कोर्टाच्या आदेशानुसार झाली असल्याचं दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांवर इडीने कारवाई सुरु केली आहे. मात्र पवार यांच्या समर्थकांनी कारवाई ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच केली असल्याचा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या-