मुंबई : उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपत प्रवेश केला. हा प्रवेश राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. यावरूनच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर 1999 मध्ये उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात पराभूत केलं होतं. आता पुन्हा करू, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
उदयनराजे भाजपमध्ये गेल्यामुळे सातारा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला मैदानात उतरवणार, अशी चर्चा होत असताना नवाब मलिक यांनी उदयनराजेंना पराभूत करण्याचा दावा केला आहे.
उदयनराजेंमुळे पक्षात नेहमी अडचण व्हायची. पवार साहेबांनी त्यांना वारंवार संधी दिली. पण अडचणीच्या काळात त्यांनी साहेबांची साथ सोडली, असं म्हणत मलिक यांनी उदयनराजेंच्या भाजपप्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, उदयनराजे भोसलेंनी जरी राष्ट्रवादी सोडली असली तरी सातारच्या पोटनिवडणुकीत आम्ही ती जागा नक्की जिंकू, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
वंचितची नियत साफ नाही… ; वंचितचा भाजपला फायदा होतोय- शरद पवार https://t.co/kz2iAQODxV @PawarSpeaks @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 14, 2019
बारामतीतच मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांवर ललकारलं! म्हणाले… https://t.co/agmBOfG1B3 @Dev_Fadnavis @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 14, 2019
“राजे दिवसा आणि रात्री कुठल्या अवस्थेत असतात… हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे” https://t.co/DJpBcfAS1G @nawabmalikncp @Chh_Udayanraje @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 14, 2019