मुंबई | मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंचरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री केला आहे. त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
पत्रकार परिषदेला 2 तास बाकी असताना बरोबर आठच्या ठोक्याला त्यांनी फडणवीसांना इशारा देणारं ट्विट केलं आहे. ‘उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है’, अशा आशयाचं ट्विट करुन मलिकांनी फडणवीसांना डिवचलं आहे.
दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फोडू म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते फडणवीसांनी काल पत्रकार परिषद घेत मलिकांवर गंभीर आरोप केले. अगदी मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मलिकांनीही अगदी काही वेळात पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आरोप फेटाळून लावले.
उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांचीच पोलखोल करणार असल्याचं मलिकांनी सांगितलं. त्यांच्या याच पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. लक्ष लागलं आहे.
मुंबईकरांच्या चिंधड्या उडवणाऱ्या व्यक्तींशी मलिकांनी व्यवहार केला कसा? असा सवाल कालच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले.
इतरही आणखी 4 व्यवहारात मलिकांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. अर्ध्या तासाच्या या पत्रकार परिषदेत फडणवीस मलिकांवर तुटून पडले होते. माझ्याकडे मलिकांच्या काळ्या कामांची यादी आह, असंही ते म्हणाले.
मी ही यादी आणि पुरावे संबंधित तपास यंत्रणांना देणार आहे. तसंच माझ्याकडचे पुरावे मी मुख्यमंत्री, शरद पवार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे देणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
दरम्यान, फडणवीसांनी केलेले आरोप सॉफ्ट पद्धतीने फेटाळून लावत त्यांचेच अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, हे सकाळी 10 वाजता उघडे पाडू, असा इशाराच नवाब मलिकांनी दिला.
महत्वाच्या बातम्या-
मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी
आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर
“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”
कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण