मुंबई | सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. यानंतर मलिक यांच्या घरावर तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचं बोललं जात आहे.
नवाब मलिक यांनी सरकारी पाहुणे कोणत्या यंत्रणेचे येणार हे काही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे मलिक यांच्या या ट्विटवर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असं मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
माझ्या घरी आज किंवा उद्या सरकारी पाहुणे येणार आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. घाबरणं रोज मेल्यासारखं आहे. आपल्याला घाबरायचं नाही तर लढायचं आहे. गांधीजी गोऱ्यांसोबत लढले होते. आपल्याला चोरांसोबत लढायचं आहे, असं मलिक यांना म्हणायचं आहे.
राज्यात शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादीकडून नवाब मलिक या दोन नेत्यांनीच भाजपवर जोरदार हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या प्रत्येक हल्ल्याला हे दोनच नेते तत्परतेने उत्तर देत असल्याने भाजप नेत्यांचीही गोची होत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मलिक यांच्या या ट्विटने तर्क वितर्क लढवले जात आहेत.
यापूर्वीही मलिक यांनी आज ना उद्या आपल्यामागेही तपास यंत्रणा लावल्या जाऊ शकतात असा संशय व्यक्त केला होता. तसेच आपला अनिल देशमुख करण्याचा भाजप आणि तपास यंत्रणांचा डाव असल्याचा आरोपही मलिक यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणाची पोलखोल करताना देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींवरून भाजपवर सातत्याने निशाणा साधला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
…फक्त त्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब
जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट; पोतानिन यांच्या पत्नीने मागितलेली रक्कम ऐकून थक्क व्हाल
10 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 32लाख