“नवाब मलिकजी माझ्यासोबत कुठल्याही राष्ट्रीय चॅनेलवर वादविवाद करा, वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवा”

मुंबई | मुंबई क्रुझ प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आलं होतं. त्याच्या अटकेनंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरच आरोपांची झोड सुरु झाली. याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उडी घेत वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर या प्रकरणानं आणखीनच पेट घेतला.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर कागपत्र दाखवत बरेच गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी भाजपवरही ताशेरे ओढलेले पहायला मिळाले. त्यामुळे या प्रकरणाला एक राजकीय वळण आलं असून राष्ट्रवादी-भाजप असा वाद निर्माण झाला आहे.

नबाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत फडणवीसांनीही पत्रकार परिषद घेतली. त्याच दिवशी मलिकांनीही पत्रकार परिषद घेत फडमवीसांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं. त्यामुळे या वादात आणखी भर पडून मलिक-फडणवीस हा नवा वाद उभा राहिला आहे.

नवाब मलिक यांच्या वारंवारं केल्या जाणाऱ्या गौप्यस्फोटामुळे आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना खुले आव्हान दिले आहे. कंबोज यांनी ट्विट करत मलिकांना हे आव्हान दिलं आहे.

मोहित कंबोज यांनी म्हटलं की, नवाब मलिकजी माझ्यासोबत कुठल्याही राष्ट्रीय चॅनेलवर वादविवाद करा. वेळ, ठिकाण तुम्ही ठरवा. त्यामुळे सध्या कंबोज यांचं हे ट्विट सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटला आता नबाव मलिक काय प्रत्युत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामुळे प्रकरण आणखी तापणार हे मात्र नक्की.

दरम्यान, मुंबई ड्रग्स प्रकरणामध्ये आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण झाले होते. तसेच या सर्व अपहरण नाट्यामागे मोहित कंबोज हे मास्टर माइंड असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. त्यानंतर हे आरोप मोहित कंबोज यांनी फेटाळून लावले होते.

कालही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले. सोबतच बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु होता. बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे असंही मलिकांनी सांगितलं.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  पोस्टाची बंपर योजना; 10 हजारांची बचत करुन ‘इतके’ लाख मिळवा

‘…हे आधी तुम्ही सिद्ध करा’; मुंबई उच्च न्यायालयाचा ज्ञानदेव वानखेडेंना झटका

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली” 

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’