“नवाब मलिक यांचा हायड्रोजन बॉम्ब फुसका निघाला”

मुंबई | मुंबई क्रुझ प्रकरणावरुन देशात खळबळ माजली आहे. या प्रकरणावरुनच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले जात होते. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळत चाललं आहे.

नवाब मलिक यांनी अनेक कागदपत्रे, पुरावे दाखवत समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय त्यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. त्यामुळे राजकीय वातावरणही चांगलंट पेटलं आहे.

नबाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत फडणवीसांनीही पत्रकार परिषद घेतली. त्याच दिवशी मलिकांनीही पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं. त्यामुळे या वादात आणखी भर पडून मलिक-फडणवीस हा नवा वाद उभा राहिला आहे.

नवाब मलिक रोज नवनवीन गौप्यस्फोट करत असल्यानं आता अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे. यातच आता गिरीश महाज यांनीही मलिकांवर निशाणा साधला आहे.

फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिकांनी हायड्रोजन बाॅम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं. याच मुद्द्यावरुन आता गिरिश महाजन यांनी निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांचा हायड्रोजन बॉम्ब फुसका निघाला, असं म्हणत गिरीश महाजनांनी खरमरीत टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं तर ते वेगवेगळे आरोप करत जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही गिरिश महाजन यांनी म्हटलं.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत ईडीची कारवाई आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे. रोज उठून नवाब मलिक नवनवीन गौप्यस्फोट करत आहे. रोज आरोपांचं सत्र लावलं आहे. त्यामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका रोजच पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  आता ऐन थंडीतही पावसाची हजेरी; हवामान खात्याचा इशारा

  “कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या, लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी”

 “राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”

“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार” 

हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद