‘आ देखें जरा किसमे कितना है दम’; नवाब मलिकांचं भाजपच्या ‘या’ नेत्याला ओपन चॅलेंज

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजप नेते मोहित कंबोज यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. एक हजार कोटी रूपयांचा हा दावा दाखल करण्यात आला आहे.

मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याबाबत प्रवीण दरेकर यांनी माहिती दिली. प्रवीण दरेकर यांनी काल ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली होती.

नवाब मलिकच्या विरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे, असं ट्विट दरेकर यांनी केलं आहे.

दरेकरांच्या या ट्विटला मलिक यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. आ देखें ज़रा किसमें कितना है दम, असं ओपन चॅलेंजच नवाब मलिक यांनी दिलं आहे.

नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सत्तेच्या मुद्द्यावरून टोला लगावला आहे.

चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय, सत्ता बिना रहा ना जाए !!!, असं म्हणत फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या विरोधात मोहित भारतीय यांनी मानहानीचा खटला दाखल करून 100 कोटींचा दावा केला होता. याप्रकरणी माझगाव न्यायालयाने गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्याचे आदेश दिले आहेत.

त्याप्रमाणे आज सोमवारी याप्रकरणाची सुनावणी माझगाव न्यायालयात पार पडली आणि आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 30 डिसेंबरला होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता! 

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल! 

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

‘या’ लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अधिक धोका!