मनोरंजन

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; 4-5 वर्षांपासून…

मुंबई | अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीमध्ये आणि त्याची पत्नी आलिया सिद्धिकीमध्ये सर्व काही आलबेल नाहीये, असं चित्र समोर आलं आहे. दोघांच्या नात्यांवरून गेली अनेक दिवस विविध चर्चा होत होत्या. आता आलियाने याबद्दलचा खुलासा करत नवाजुद्दीन आणि मी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून वेगळे राहत आहोत, असा गौप्यस्फोट केलाय.

आलिया आणि नवाजुद्दीनच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली आहे. अशातच तिने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस देखील पाठवली आाहे. तसंच त्याच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप देखील केले आहेत. एबीपी न्यूजशी संवाद साधताना तिने याबद्दलचा खुलासा केला.

जेव्हापासून आमचं लग्न झालं तेव्हापासून अगदी सुरूवातीच्या काळापासूनच आमच्यात भांडणं व्हायला सुरूवात झाली. मग अडचणी वाढत गेल्या. शेवटी मी घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आली आहे, असं आलियाने सांगितलं.

नवाजुद्दीनलाच नाही तर त्याच्या भावांना देखील स्त्रियांची कदर ठेवता येत नाही. नवाजुद्दीन आणि माझ्यामध्ये जेव्हाही कधी बोलणं व्हायचं त्यावेळी तो फक्त माझ्या चुकीच्या गोष्टींवरच बोलायचा. अनेक वेळा त्याने सगळ्यांसमोर माझा अपमान केला. तुला काही कळत नाही. तू गप्प बसत जा, अशा प्रकारे तो मला हिनवायचा. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने मला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला, असा सगळा अनुभव आलियाने कथन केला.

महत्वाच्या बातम्या-

-रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सोय करा; चाकणकरांची सहकाऱ्यांना विनंती

-सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांची हजेरी

-आजचं आंदोलन भाजपच्या अंगलट?; सोशल मीडियावर #महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड

-पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण

-आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका