‘ते’ प्रकरण अर्जुन रामपालला महागात पडणार! लवकरच होऊ शकते अ.टक?

मुंबई | अं.मली पदार्थ प्रकरणामुळे बॉलीवूड मधील अनेक अभिनेते अडचनीत आले आहेत. त्यातच आता अजुन एका अभिनेत्याची भर पडली आहे. बॉलिवूड ड्र,ग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीकडून सध्या चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल झाला होता.

सोमवारी अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. यानंतर अर्जुन रामपालला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

सोमवारी अर्जुन रामपालच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हा तपास सुरू होता. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच, अर्जुनच्या वाहन चालकालाही ता.ब्यात घेतले होते

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन रामपालला तू ड्र.ग्ज घ्यायचा की नाही, असा सवाल चौकशीदरम्यान केला जात होता. याचबरोबर मैत्रिण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिचा भाऊ अ‍ॅगिसिलोस ड्र.ग्ज घेतो हे तुला माहित होते का?, तपासात मिळालेली औषधे तुझ्या घरी कशी आली? अशा प्रश्नांची उत्तरे अर्जुनकडून मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. तब्बल 3 तास त्याची कसून चौकशी सुरू होती.

बॉलिवूड ड्र.ग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबी त्यांच्या तपासाची व्याप्ती सातत्याने वाढवत आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अर्जुन रामपालच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती.

अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेललाही एनसीबीने अट.क केली आहे. अं.मली पदार्थ प्रकरणात अर्जुनच्या मित्राला अ.टक करण्यात आल्याने त्याच्या अडचणींत देखील वाढ झाली आहे.

पॉल हा ऑस्ट्रेलियन असून तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करतो. तो आर्किटेक्ट आहे. ऑस्ट्रेलियन पॉल बार्टेलविरोधी अं.मली पदार्थ प्रकरणी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं त्याला ता.ब्यात घेतलं आहे.

दरम्यान, एनसीबी तपासादरम्यान त्यांना अर्जुन रामपालच्या घरी काही टॅबलेट सापडले होते. या टॅबलेट भारतात विकण्यास बंदी आहे.

अर्जुन रामपालने त्या टॅबलेटबाबत अजून काही खुलासा केलेला नाही. त्या टॅबलेटबाबत त्याने योग्य तो खुलासा न केल्यास त्यांना अ.टक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला आणखी मोठा झटका! ‘या’ बड्या नेत्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला

‘…तेव्हा किरीट सोमय्यांची बोबडी वळली होती का?’; नाईक कुटुंबियांचा सोमय्या यांना सणसणीत टोला

अर्णव गोस्वामींना दुसरा मोठा झटका! आता ‘या’ प्रकरणी अर्णव गजाआड जाणार?

मिलिंदच्या न.ग्न फोटोला पाठींबा देणाऱ्या अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ! एबीएपीने उचललं तिच्याविरुद्ध पाऊल

धक्कादायक! ‘या’ बड्या अभिनेत्रीचा वरून धवनवर चोरीचा आरोप