Top news मनोरंजन

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीचा मोठा दावा!

sushant riya

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. सुशांतच्या मृत्यूला दोन वर्षे उलटले तरी त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली असा प्रश्न आजही त्याचे चाहते उपस्थित करतात.

सुशांतच्या मृत्यूच्या तपासात अनेक गोष्टींच्या उलगडा झाला. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं.

सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने उडी घेत अनेक बॉलिवूड कलाकारांची व बॉलिवूड संबंधित लोकांची चौकशी केली होती. याप्रकरणी एनसीबीने सुशांतची मैत्रिण व अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ताब्यात घेतलं होतं.

रिया सध्या जामीनावर बाहेर असून एनसीबीने केलेल्या नव्या आरोपांमुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज प्रकरण हे सुशांतच्या मृत्यूशी जोडलेलं असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे.

रिया व तिचा भाऊ शौविकने ड्रग्ज पेडलर्सकडून गांजा खरेदी करून अनेकदा सुशांतला दिला होता, असा खळबळजनक आरोप एनसीबीने केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात एनसीबीने केला आहे.

एनसीबीने दिलेल्या आरोपांचा मसूदा जाहीर झाला असून रियासह याप्रकरणातील इतर आरोपींवर आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पडणार आहे. एनसीबीच्या या आरोपांमुळे रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एनसीबीने सर्व आरोपींवर एनडीपीएस कलम 27 आणि 27 (अ), कलम 28 आणि कलम 29 यांसारख्या एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोप ठेवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसेनेनं मुर्मूंना पाठिंबा जाहीर करताच बाळासाहेब थोरातांचं सूचक ट्विट, म्हणाले…

‘काय तो दांडा आणि काय ते ढुं..’ म्हणत शिंदे गटावर निशाणा साधणाऱ्या प्रवक्त्याही शिंदे गटात!

पुणेकरांनो सावधान… खडकवासला 100 टक्के भरलं, नदीचं पाणी वाढतंय!

“विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचाय”

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!