राष्ट्रवादीशी संबंधित युवतीला अटक, कारण ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल

चंद्रपूर | गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे.

चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाहन चोरांच्या एका टोळीला अटक केली होती. त्यावेळी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

चंद्रपूर पोलिसांनी अटक केलेल्या या टोळीमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं समोर आलं होतं. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ही तरूणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी संबंधित असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी संबंधित असलेल्या या तरूणीचं नाव वैष्णवी देवतळे आहे. तिच्या दोन साथीदारांसह या तरूणीला अटक करण्यात आली. ही तरूणी चंद्रपूरमध्ये गाड्या चोरायची. ज्या दुचाकीचं हँडल लाॅक असेल त्या दुचाकीची चोरी ही टोळी करत होती.

पंन्नास ते सत्तर हजार रूपयांची दुचाकी केवळ पाच ते दहा हजार रूपयांना विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा व्यवहार संशयास्पद असल्याने पोलिसांनी या टोळी पकडले. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला आहे.

चौकशी करत असताना तरूणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं. एखाद्या गाडीवर नजर ठेवायची आणि नंतर ती गाडी चोरायची, अशा प्रकारे चोरी केली जात होती.

आरोपी आणि मैत्रिण काही अंतरावर गाडीला धक्का देऊन नेत आणि नंतर त्या गाडीची डुब्लिकेट चावी तयार करत आणि गाडी स्वस्त किंमतीत बाजारात विकत होते.

या तरूणीची गेल्या महिन्यातच पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. ही युवती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. मात्र तिला 20 ऑक्टोबरला पक्षातून काढून टाकण्यात आल्याचं राजीव कक्कड यांनी सांगितलं आहे.

वारंवार सूचना देऊन देखील पक्षशिस्त न पाळणे, तसेच पक्षाच्या विरोधात कारवाई करणे यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ज्यावेळी पक्षात प्रवेश देण्यात आला होता. त्यावेळी पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं. त्यावेळी तरूणीवर कोणतेही गुन्हे नव्हते, असंही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

भाजप की काॅंग्रेस! कोल्हापूरच्या आखाड्यात कोणाचा पैलवान जिंकणार?

 “गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणणं म्हणजे हा गेंड्याचाच अपमान”

“उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”

  ‘…तर होय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचा हात’; राऊतांच्या आरोपावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

  मुंबईकरांनो सावधान! आता ‘या’ गोष्टीने वाढवले टेंशन