मुंबई | शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भाजपच्या आश्रयाने राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. त्यांच्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सतत आरोप करत असतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रविकांत वरपे (Ravikant Varape) यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत.
सदर फोटोत मुंख्यमंत्र्यांच्या खुर्चीत खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) बसलेले आहेत आणि ते कारभार करत आहेत, असे दिसत आहे. हा फोटो मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील असल्याचा दावा राष्ट्रवादीचा आहे.
तो फोटो अतिशय जबाबदार व्यक्तीने मला पाठविला आहे. मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातील हा फोटो आहे, असे वरपे म्हणाले आहेत.
रविकांत वरपे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, खासदार श्रीकांत शिंदेंना सुपर सीएम (Super Chief Minister) झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव त्यांच्या पदाचा कारभार सांभळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?
कदाचीत राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष किंवा दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यग्र असल्यामुळे राज्यातील इतर लोकांचे काम पाहण्याची जबाबदारी सुपर सीएमवर सोपण्यात आली आहे, असा चिमटा वरपेंनी काढला.
तसेच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या कार्यालयाची गनिमा त्यांच्या कुटुंबियांनी ठेवली पाहिजे. तुम्हाला काय बैठकी घ्यायच्या असतील, तर त्या बाजूच्या खुर्चीत बसून घ्या. ती खुर्ची महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या स्वाभिमानाची खुर्ची आहे, असे स्पष्ट मत वरपेंनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या –
राज ठाकरेंच्या ‘मुन्नाभाई’ उल्लेखावर मनसेचे प्रत्युत्तर; उद्धव ठाकरेंना दिली ‘या’ कलाकाराची उपमा
‘काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींचे मोठे वक्तव्य’
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे शेवटचा पर्याय काय? अनिल परब म्हणाले…
मोहन भागवतांनी दिल्लीत मशिदीला दिली भेट; देशभरात चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप; मविआने मला गेली अडीच वर्षे